हाइकु मञ्जूषा (समसामयिक हाइकु संचयनिका)

卐 ~•~ 卐 ~•~ 卐 ~•~ 卐 ~•~ हाइकु मञ्जूषा (समसामयिक हाइकु संचयनिका) संचालक : प्रदीप कुमार दाश "दीपक" ~•~ 卐 ~•~ 卐 ~•~ 卐 ~•~ 卐
A3 - मराठी हाइकु (MARATHI HAIKU) लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
A3 - मराठी हाइकु (MARATHI HAIKU) लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

शुक्रवार, 21 मई 2021

मराठी हाइकु : प्रदीप कुमार दाश "दीपक"

हाइकुकार

प्रदीप कुमार दाश "दीपक"


हाइकु 

--0--


1)

पाऊस आला 

बुडबुडे रडती 

ऐकले हो मी 


2)

प्रेमाच्या गोष्टी 

अमावस्येच्या दिनी 

रात्र चांदनी ।


3)

श्रावणा सूनं 

प्रियकराची वाट

सुजले डोळे


4)

मेघ गर्जले 

माती ही सुवासिली

धरा हर्षिली


5)

जीवन संध्या

मी उभा काठावर

सिंधू गहन 


6)

शब्दांची व्यथा

चुळबुळू लागली

पुस्तके माझी

---00---


✍प्रदीप कुमार दाश "दीपक"

~•~ मराठी हाइकुकार प्रकाश पोळ जी के हाइकु ~•~

हाइकुकार

प्रकाश पोळ


हाइकु 

--0--


गुलाबी पाने 

पिंपळ झाडावर

हिरवी मने 


ऊन पिवळे

दिवसभर खेळे

सांज सावळे 


लाल पाकळ्या 

नटलाय गुलाब 

काय रूबाब 


वेळ निघते

पुढेच सरसर

क्षणभंगुर ।


वड पारंब्या

जमिनीवर आल्या

झुलाच झाल्या 


कोवळी उन्हे

पिंपळाच्या पानांत

सळसळत


पावशा पक्षी

पेरते व्हा , सांगतो

शीळ घालतो 


उन्हं तिरिप

आत आली घरात

लडीवाळात 


पाऊस आला

ओल्या मातीचा वास

अत्तर खास


पक्ष्यांचे सूर

गळ्यातून बाहेर

नादमधुर


रानात दूर

गेली पक्ष्याची शीळ

गातो कोकिळ 


चहाची वाफ

विभोर पावसात

सखी सोबत

---00---


~ प्रकाश पोळ

MOST POPULAR POST IN MONTH