हाइकुकार
प्रकाश पोळ
हाइकु
--0--
गुलाबी पाने
पिंपळ झाडावर
हिरवी मने
ऊन पिवळे
दिवसभर खेळे
सांज सावळे
लाल पाकळ्या
नटलाय गुलाब
काय रूबाब
वेळ निघते
पुढेच सरसर
क्षणभंगुर ।
वड पारंब्या
जमिनीवर आल्या
झुलाच झाल्या
कोवळी उन्हे
पिंपळाच्या पानांत
सळसळत
पावशा पक्षी
पेरते व्हा , सांगतो
शीळ घालतो
उन्हं तिरिप
आत आली घरात
लडीवाळात
पाऊस आला
ओल्या मातीचा वास
अत्तर खास
पक्ष्यांचे सूर
गळ्यातून बाहेर
नादमधुर
रानात दूर
गेली पक्ष्याची शीळ
गातो कोकिळ
चहाची वाफ
विभोर पावसात
सखी सोबत
---00---
~ प्रकाश पोळ
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें